[ie_dailymotion id=x7g1jn4] 'मला वाटतं की आपल्या देशात चांगल्या कलाकारांची कमतरता नाही. त्यामुळे आपण आपल्याच कलाकारांना अधिक प्राधान्य देणं गरजेचं आहे. शिवाय याआधी आपल्याकडे बाहेरच्या कलाकारांना घ्यायचे नाही असा कोणताही नियम नव्हता. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांना घेऊन जे सिनेमे बनवून तयार आहेत त्यांच्यावर हा अन्याय आहे. यापुढे असे नियम तयार करुन आपण त्याप्रमाणे चालू शकतो. पण जे सिनेमे तयार आहेत त्यांच्यावर अन्याय करु नये. सध्या देशवासियांच्या भावनांचा मला आदर आहे. त्यामुळे मी दोन्ही बाजूने विचार करते.