[ie_dailymotion id=x7g1aie] हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांची नाती आणि त्या नात्यांविषयी रंगणाऱ्या चर्चा ही काही नवीन बाब नाही. कलाकारांनी त्यांचे खासगी आयुष्य कितीही खासगी ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही सर्वांसमोर उघड व्हायची गोष्ट काही केल्या लपवता येत नाही हेच खरे! काही कलाकारांच्या खासगी जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी तर अनेकांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. अशाच कलाकारांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे रणबीर कपूर. गेल्या वर्षी रणबीर कपूर आणि कतरिना कैफच्या नात्यात दुरावा आल्यानंतर या दोघांनीही आपापल्या वाटा वेगळ्या करत नव्या आयुष्याची सुरुवात केली.