देहू गावात एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने दारूच्या नशेत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलिसात तुषार सुरेश चव्हाण या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुषारच्या आजीला बेशुद्ध अवस्थेत देहूगावतील युनिकेअर रूग्णालयात आणण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले मात्र आजीचा उपचादरम्यान मृत्यू झाला. याच रागातून तुषारने दारूच्या नशेत रुग्णालयात गोंधळ घालत, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.#CCTVCamera #pune #hospital #dehu