Navratri 2023: नंदुरबारमध्ये देवीच्या विविध सजावटीतील मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी | Nandurbar
घटस्थापनेला एवघे काही तास शिल्लक असून बाजारात आता मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, नंदुरबारमधील काही मोजक्याच मूर्ती कारखान्यांमध्ये मूर्ती तयार केल्या जातात. नंदुरबार शहरातील अहिल्याबाई विहिरी जवळील मूर्तिकार मनोज सोनार यांच्याकडे जगदंबा, कालिका, अंबेमाता यांच्या मूर्ती विविध सजावटीने तयार करण्यात आल्या आहेत. काही मूर्तींच्या मागे विठू माऊली तसेच राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.





