पुण्यातील सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला दसऱ्यानिमित्त सोन्याची साडी नेसवण्यात आली आहे. ही साडी तब्बल १६ किलो वजनाची आहे. दसरा, दिवाळी आणि पाडवा असं वर्षातून तिनदा देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे. नवरात्रीच्या अखरेच्या दिवशी म्हणजेच दसरा सणानिमित्त भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
 
  
  
  
  
  
  
   
   
   
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 



 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  