[ie_dailymotion id=x7g1gyy] टिव्ही अभिनेत्री दिशा वकानी Disha Vakani ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेने प्रसिद्धीस आली. ही मालिका सुरु झाल्यापासूनच दिशा या मालिकेचा भाग आहे. तिच्या अतरंगी विनोदांनी ती नेहमीच चाहत्यांचे मनोरंजन करत आली आहे. ती साकारत असलेली दयाबेन ही भूमिका आता सर्वांच्या आवडीची झाली आहे. पण, आता तुम्हाला दयाबेनला मालिकेत पाहता येणार नाही. पण, मालिका पाहणाऱ्यांना नाराज होण्याचं कारण नाही. कारण दिशा वकानी मालिका सोडणार नाही, तर ती फक्त काही महिन्यांपुरता मालिकेतून ब्रेक घेणार आहे. दिशा गरोदर असल्याने काही काळासाठी ती मालिकेत दिसणार नसल्याचे समजते.