लग्नाआधी शाहिरीबद्दल काहीही माहिती नसलेल्या संगीता मावळे आज एक परिपूर्ण शाहिरा आहेत. सासरमधील कुटुंबीयांच्या तालमीत तयार झालेल्या संगीता मावळे आपल्या पोवाड्यांमधून सामाजिक प्रबोधन करत असतात. यावेळी खासकरुन स्त्री भ्रूण हत्या रोखणं तसंच जिजामातांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं प्रमुख ध्येय असतं. ‘जागर नवदुर्गां’चा मध्ये जाणून घेऊयात त्यांचा प्रवास…







