25 January 2020

News Flash

नरसिंग यादव निर्दोष, उत्तेजक सेवनप्रकरणी ‘नाडा’चा निर्वाळा


भारताचा मल्ल नरसिंग यादवच्या उत्तेजक सेवनप्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून उठलेले वादळ आता संपुष्टात आले आहे. राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेच्या(नाडा) शिस्तपालन समितीने नरसिंग यादवला निर्दोष जाहीर केले आहे. उत्तेजक सेवनप्रकरणात नरसिंग यादवचा काहीच दोष नसल्याचा निर्वाळा ‘नाडा’ने दिला आहे. नरसिंग सेवन करत असलेल्या ड्रींक्समध्ये भेसळ करण्यात आली होती, असे ‘नाडा’ने आज दिलेल्या निर्णयात जाहीर केले. ‘नाडा’च्या निर्णयामुळे नरसिंगवरील ऑलिम्पिक समावेशाबाबतचे सावट आता दूर होण्याची शक्यता आहे.

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 वेगळ्या विदर्भाविरोधात पुन्हा शिवसेना आक्रमक
2 कल्याणमध्ये रेल्वे रुळावरून घसरली
3 …आणि दिवाकर रावते भाजप आमदारांवर धावून गेले
Just Now!
X