News Flash

बीसीसीआयची आर्थिक कोंडी, लेखापरीक्षक नेमण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यास दिरंगाई करणा-या बीसीसीआयला सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांवरच निर्बंध आणले आहे. कोर्टाने लोढा समितीला तातडीने बीसीसीआयच्या आर्थिक व्यवहारांसाठी मर्यादा आखून देण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार ठराविक रकमेवरील करार करताना बीसीसीआयला परवानगी घेणे बंधनकारक होणार आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X