सुप्रीम कोर्टाकडून भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर(बीसीसीआय) आर्थिक निर्बंध लादण्यात आल्यामुळे ‘बीसीसीआय’ आणि इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डामध्ये करण्यात आलेल्या सामंजस्य कराराचे पालन करता येणार नसल्याची भूमिका ‘बीसीसीआय’ने घेतली आहे. बीसीसीआयने तसे लेखी स्वरूपात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला कळवले आहे.