मुंबईतील पूर्व मुक्त मार्गावर शनिवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या टॅक्सीचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. पूर्व मुक्त मार्गावरील वाडीबंदर येथे हा अपघात झाला. टॅक्सीतील सर्व प्रवासी मुंबादेवीच्या दर्शनासाठी जात होते.