पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सीमेजवळ शस्त्र सराव सुरू केला आहे. व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पंजाब प्रांतात पाकिस्तानी सैन्याने सरावाला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरिफ आणि लष्करप्रमुख राहिल शरिफ यांनी पाकिस्तानी सैन्याच्या सरावाचा आढावा घेतला आहे. पाकिस्तानी सैन्याची शस्त्र सज्जता, हवाई दलाची युद्ध सज्जता यांचा पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्करप्रमुख यांनी आढावा घेतला.