[ie_dailymotion id=x7g1fng] नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वकाही सुरळीत होण्यासाठी पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे ५० दिवसांची मुदत मागितली होती. मात्र ५० दिवसानंतरही देशभरातील बहुतांश एटीएम पैसे नसल्याने चलनकल्लोळ कायम आहे. त्यातच आता एटीएम आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे. नोटाबंदीनंतर सरकारकडून एटीएम आणि डेबिट कार्डवर शुल्क आकारले जात नव्हते. मात्र नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चलनकल्लोळ संपण्याआधीच सरकारने एटीएम आणि डेबिट कार्डवर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नोटाबंदीमुळे मनस्ताप सोसणाऱ्या लोकांच्या खिशाला अतिरिक्त भार सोसावा लागणार आहे.