राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कर्नाटकात पुतळा जाळल्यानंतर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून युवासैनिकांनी कोल्हापूरमध्ये थिएटरमध्ये घुसून कन्नड चित्रपटाचा शो बंद पाडलाय. याशिवाय युवासैनिकांनी चित्रपटगृहावरील कन्नड पोस्टरही उतरवले आहेत. युवासैनिकांनी कोल्हापूरच्या अप्सरा थिएटरमध्ये सुरू असलेला ‘अवणे श्रीमनारायन’ हा चित्रपट थिएटरमध्ये घुसून बंद पाडला. सीमावादातून दोन्ही राज्यांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. खबरदारी म्हणून दोन्ही राज्यांतील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे.