लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमध्ये हरिपाठ न आल्याने मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. मागील आठ दिवसांपासून ११ वर्षीय मुलगा कोमात होता. ओम राजू चौधरी असे मारहाण झालेल्या मुलाचे नाव असून सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु, त्यांची प्रकृती नाजूक असून तो अद्यापही कोमात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. भगवान महाराज पोव्हणे असे मारहाण करणाऱ्या आरोपी महाराजांचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी मुलाची आई कविता राजू चौधरी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार महाराजांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.