ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता
अरबी समुद्रात जे कमी दाबाचं क्षेत्र होतं त्यानं आता चक्रीवादळाचं रुप धारण केलं आहे. पुढच्या बारा तासांमध्ये हे चक्रीवादळ आणखी तीव्र होणार आहे. इथं वाऱ्याचा वेग १०० ते ११० किमी प्रतितास असेल. तो १२० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मुंबईपासून ४३० किमी दूर तर गोव्यापासून २८० किमी दूर आहे. या चक्रीवादळामुळं ३ जून रोजी ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे