जगभरात करोना विषाणूंने थैमान घातले असून आपल्या देशात देखील दिवसेंदिवस रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र तरी देखील रुग्ण वाढत आहे. यामध्ये सर्व सामन्य नागरिकसह रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स हे देखील बाधित आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील दस्तुर स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणार्या विराज राहुल शाह या १४ वर्षाच्या मुलाने कोव्हिड 19 वाॅर बाॅट रोबोट तयार केला.