रयत क्रांती संघटनेकडून एन डी चौघुले यांनी आज अर्ज दाखल केला आहे. त्यांच पुणे विभागात चांगले काम आहे. त्या दृष्टीने आम्ही त्यांना उमेदवारी दिली आहे. पण आम्ही महायुतीचा घटक असून काल महायुतीच्या उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांच्या उमेदवाराचे नावे महायुतीमधील घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्यात आली नाही. पण आताही भाजप नेत्यांनी आमच्याशी चर्चा केल्यास उमेदवारी मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.