देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या वेळी प्रतिष्ठेची असणारी जलयुक्त शिवार योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. कॅगच्या अहवालात या योजनेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर कथित गैरव्यवहाराची खुली चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून तत्कालीन संबंधित मंत्र्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या मुद्द्यावर भाजपाचे माजी मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात प्रतिक्रिया दिली. या योजनेबाबत चौकशीचा ससेमिरा मागे लावणं म्हणजे सूडबुद्धी आणि आकसबुद्धीने करण्यात येणारी कारवाई आहे असे राम शिंदे म्हणाले.