राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.