‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून त्यावर वादही निर्माण झाले आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवारी (दि. ३० एप्रिल) चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका केली. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर मागच्या आठवड्यात यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर बरेच वादंग माजले आहे. केरळमध्ये एवढ्या प्रमाणात खरेच धर्मांतर झाले आहे का? तेथील युवतींना इसिसमध्ये सामील केले आहे का? जाणून घेऊयात या पॉडकास्टमधून…