समर्थ रामदास आणि The Kerala Story यांचा संबंध काय?; योगेश सोमण यांचा व्हिडीओ व्हायरल
‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाच मे रोजी प्रदर्शित झाला असून या चित्रपटावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या चित्रपटावरून अनेक वाद होत आहेत. यादरम्यान अभिनेते योगेश सोमण यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात त्यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची वन लाईनर स्टोरी ही समर्थ रामदास यांनी शेकडो वर्षांपूर्वीच लिहून ठेवली असल्याचे सांगितले आहे