‘राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय स्वागतार्ह असून त्यातुन उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने नवीन सरकार कायदेशीर असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. शिंदे गटाला दिलासा देत १६ आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे त्यामुळे हे सरकार मजबुत व स्थिर आहे’ असं मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलं.