कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं. भाजपा, काँग्रेस, जनता दल ( धर्मनिपेक्षक ) यांच्यात प्रमूख लढत झाली. शुक्रवार ( १३ मे ) मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. यावेळी निकालाचे सुरुवातीचे कल जाहीर होताच, बंगळुरूत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, पक्षाचा झेंडा फडकावत घोषणाबाजी करत कार्यकर्ते उत्साही झालेले पाहायला मिळाले.