Imtiyaz Jaleel on Modi: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून इम्तियाज जलील यांनी भाजपाला डिवचलं
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला असून त्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचं आता दिसून येत आहे. या निकालावर प्रतिक्रिया देताना एम. आय. एमचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपाला डिवचलं आहे. ‘कर्नाटकमधील पराभवाला मोदी-शाह जबाबदार असून मी मोदी-शाहंना पॉपकॉर्न आणि ‘द केरला स्टोरीज’ या पिक्चरची तिकीटं दिली आहेत’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.