Sanjay Raut: ‘नार्वेकर खरंच वकील असतील, तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा’; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. “राहुल नार्वेकर शिवसेनेचे उरलेले १६ आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत”, असा आरोप राऊतांनी केला. तसेच पक्षांतर हा नार्वेकरांचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय असल्याची टीकाही राऊतांनी केली. ते रविवारी (१४ मे) पत्रकार परिषदेत बोलत होते