Raj Thackeray: ‘आपलं कोण वाकडं करू शकतो असं..’; राज ठाकरेंचं भाजपाला टोला देत कर्नाटक निकालावर भाष्य
देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी (१३ मे) लागला. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा दारूण पराभव केला. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी हा पराभव भाजपाच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं. ते रविवारी (१४ मे) अंबरनाथमध्ये आले असताना पत्रकारांशी बोलत होते