Rahul Narvekar: “आपण सर्वांनी आश्वासित राहावं, जो निर्णय होईल…”; राहुल नार्वेकरांचं महत्त्वाचं विधान
१६ आमदारांच्या आपात्रतेच्या मुद्द्यावरून सध्या वातावरण तापलं आहे. ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने विधानसभा सचिवांची भेट घेत या संदर्भात पत्र दिलं आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे लंडन दौऱ्यावरून परतले आहेत. या संदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, नियमांच्या आधारे आणि कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार निर्णय होईल