Ajit Pawar: ‘हे सारखं सारखं का करावं लागतंय?”; मोदी सरकारच्या निर्णयावर अजित पवारांची टीका
दोन हजारांची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर कडाडून टीका होते आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आपल्या खास शैलीत या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “काही निर्णय राज्यकर्ते म्हणून घ्यावे लागतात. नकली नोटा, बनावट नोटा, बाहेरच्या लोकांनी चलन अडचणीत आणायचा प्रयत्न केला बदल करावे लागतात याबद्दल दुमत नाही. पण हे सारखं सारखं का करावं लागतंय? याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे” असं म्हणत अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे