Pimpari Chinchwad: पिंपरी-चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच; घटना सीसीटीव्हीत कैद
पिंपरी- चिंचवडमध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील चिखली घरकुल परिसरात दोन अज्ञातांनी दारूच्या नशेत चारचाकी वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी दोघांना चिखली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाहन तोडफोडीची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे