नागपूर ते पुणे जात असलेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. ही ट्रॅव्हल्स नागपूर येथून पाच वाजता निघाली होती. २०२० मध्ये ही ट्रॅव्हल्स विकत घेण्यात आली असून लॉकडाऊनमुळे वर्षभर ही बस उभीच होती. सर्व कागदपत्रे क्लिअर असून चालकदेखील अनुभवी होता असं संचालकांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आपण प्रवाशी कुटुंबाच्या संपर्कात असल्याचा दावा दरणे यांनी केला.