Rahul Kanal Joins Shivsena: राहुल कनाल शिंदेंच्या शिवसेनेत!; पहिल्याच भाषणात थेट सुशांतसिंहचा उल्लेख
युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी शनिवारी ( १ जुलै ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून राहुल कनाल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. अखेर शनिवारी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना राहुल कनाल यांनी सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख केला आहे