Sharad Pawar:’आज जो प्रकार घडला आहे, तो…’; अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे