Ashish Shelar on Thackeray: ‘मर्दांचा पक्ष असेल तर आदित्य ठाकरेंना…’; आशीष शेलारांचा हल्लाबोल
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे सक्रिय झाले असून ते महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. दरम्यान, आज त्यांनी अमरावतीत जाहीर सभा घेतली. यानंतर उद्धव ठाकरेंवर टीका करताना भाजपा नेते आशीष शेलार म्हणाले की, “जे स्वतःच्या वडिलांचा विचार सोडू लागले, जे स्वतःच्या वडिलांनी घेतलेल्या भूमिकेला पायदळी तुडवू लागले, जे स्वतःच्या वडिलांनी दिलेल्या कार्यक्रमाला टोचून बाहेर काढायला लागले त्या लोकांना वडिलांच्या पक्षाच नाव मागण्याचा अधिकारच कुठे उरतो? उद्धव ठाकरे तुम्ही आणि तुमचा पक्ष मर्दांची अवलाद असाल तर तुमच्या सुपुत्राला वरळीचा राजीनामा द्यायला सांगा. त्या वरळीला आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलात आणि मर्दांचा उबाठा पक्ष असेल तर त्यांनी वरळीत आदित्य ठाकरेंना राजीनामा द्यायला लावावा, निवडणूकींना सामोर जावं आणि मग अशी भाषा करावी. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात अपयशी नेता ही उद्धव ठाकरेंची ओळख आहे”