ज्येष्ठ मराठी सिने अभिनेते रवींद्र महाजनी यांचे पुण्यातील तळेगाव येथे दुर्दैवी निधन झालं आहे. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र महाजनी हे तळेगावातील सोसायटीच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहण्यास होते. त्यांच्या अशा पद्धतीने जाण्याने शेजारचेदेखील हळहळले आहेत. त्यांच्याजवळ कोणी नसताना त्यांचा मृत्यू झाला याचं खूप वाईट वाटत असल्याचं शेजाऱ्यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितला आहे.