इंडिया टू डे आणि सी व्होटरचा सर्व्हे समोर आला आहे. यामध्ये लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीपेक्षा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील. मात्र केंद्रात मोदी सरकारचं येईल, असं सर्व्हेतून निदर्शनास आलं आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज (२५ ऑगस्ट) कोल्हापूरमध्ये त्यांची सभा आहे. त्यानिमित्ताने त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.