दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी सरकारी नोकरदाराच्या पगारात तीन कंत्राटी कामगार येतात, असं म्हणतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याबद्दल अजित पवारांनी स्वतः माध्यमांना प्रतिक्रिया देताना याचे स्पष्टीकरण दिले. “माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला गेला. विनाकारण मला ट्रोल करण्यात आलं. राज्यातील वेगवेगळ्या विभागात दीड लाख पदांची भरतीप्रक्रिया सुरू आहे. मी आता सत्ताधारी पक्षात आहे. मात्र आमचे जे विरोधक आहेत, त्यांना उकळ्या फुटत आहेत. ते सोशल मीडियावर वेगळ्या पद्धतीने बातम्या पसरवतात” असं पवार म्हणाले.