दिवाळी दरम्यान शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून पुन्हा एकदा राजकीय चर्चा रंगू लागली आहे. या संदर्भात आज (१४ नोव्हेंबर) पंढरपुरात शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवारांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्यानंतर अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.






















