Who is Arun Yogiraj: अयोध्येतल्या राम मंदिरातील रामाची मूर्ती साकारणारे अरुण योगीराज आहेत कोण?
अयोध्येतल्या राम मंदिरात २२ जानेवारी या दिवशी रामाची मूर्ती स्थापन करुन प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. रामलल्लाची म्हणजेच बाल रुपातील रामाची मूर्ती मंदिरात असणार आहेच. याशिवाय राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचीही मूर्ती मंदिरात असणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी साकारलेली मूर्ती या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करुन ठेवली जाणार आहे. अरुण योगीराज यांनी साकारलेल्या मूर्तीची निवड झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. आपण जाणून घेऊ हे मूर्तिकार अरुण योगीराज कोण आहेत?