राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (५ जानेवारी) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेथील कामाबाबत आणि अनेक प्रकल्पा बाबत माहिती जाणून घेतली. तर काही आवश्यक सूचना देखील अजित पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.