जिल्ह्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत विकासाची शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद करून त्याआधारे तयार करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ अहवालाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (१५ फेब्रुवारी) मुंबईत पार पडला. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी फडणवीसांनी “जिल्हा निर्देशांकसारखे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण!” असं विधान करत लोकसत्ताचे आभार मानले.