अजित पवारांनी भाजपाबरोबर वेगळी वाट धरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर फूट पडलीच, पण पवार कुटुंबातही दुरावा निर्माण झाला अशी चर्चा सुरुये. पण आता शरद पवारांनी अजित पवारांना मोठा दक्का दिलाय असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. अजित पवारांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्याबरोबर असल्याचं सांगितलंय. एवढंच नसून येत्या निवडणुकीसाठी तो प्रचारातही सहभागी होणार असं दिसतंय.