महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायर ब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांची ओळख होती. माजी नगरसेवक असलेल्या वसंत मोरे यांनी आपल्या हातोडा स्टाईलने पुण्यात स्वतःचे वलय निर्माण केले होते. मात्र मंगळवारी म्हणजेच १२ मार्चला वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आणि एकच खळबळ उडाली. राजीनामा दिल्यानंतर कॉँग्रेस नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरेंच्या कार्यालयात आले आणि त्यांची भेट घेतली.
 
   
   
   
  







 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 











 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  