पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर होते. आरबीआय स्थापनेच्या ९०व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सोहळ्याला मोदींनी उपस्थिती लावली होती. पर्यटन क्षेत्राला आर्थिक मदत करण्यासाठी आपली काय तयारी आहे हे आपल्याला पाहिलं पाहिजे. हे सांगतानाच मोदींनी निवडणूक जिंकून आपण पुन्हा शपथ घेऊ असं अप्रत्यक्षपणे जाहीरच केलं.