आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रचारसभांना वेग आला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय संजय राऊतांनी व्यक्त केला असून त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. याकरता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोदींना हे पत्र पाठवलं असल्याचं सांगितलं आहे.



















