लोकसभा निवडणुकीचे निकाल आज (४ जून) जाहीर झाले. महाराष्ट्रातील निवडणुकीचा कल पाहता भाजपाला विदर्भात मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. १० पैकी ७ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यातील २ भाजपा तर एक जागा शिंदे गटाला मिळाली आहे. विदर्भात भाजपाला हा मोठा धक्का मानला जात असून त्याची नेमकी कारणं काय? यासंदर्भात लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केलेलं हे विश्लेषण…