२५ जुलैला झालेली यशश्रीची हत्या, २७ जुलैला सापडलेला मृतदेह आणि मग त्यानंतर दिसलेला जनआक्रोश.. उरण येथील यशश्री शिंदे हत्याकांडाने महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देश हादरला आहे. दाऊद शेखने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले, तिची हत्या केली. या प्रकरणात सध्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मुद्दे प्रचंड चर्चेत आहेत ते म्हणजे यशश्रीच्या अंगावरील टॅटू आणि यशश्री- दाऊदच्या यांच्यातील ‘तिसरी व्यक्ती’. दाऊदने यशश्री शिंदेला जेव्हा २५ जुलैच्या दिवशी भेटायला बोलवलं तेव्हा तो चाकू बरोबर घेऊनच आला होता त्यामुळे तिची हत्या हा कटच होता अशी माहिती पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी माध्यमांना दिली. याशिवाय पोलिसांनी या प्रकरणाविषयी नेमके कोणते विशेष खुलासे केले आहेत हे आपण पाहूया.

 
  
  
  
  
  
   
   
   
  









 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 



 
  
  
  
  
  
  
  
  
   
   
  