Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठीच्या घरात चौथ्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्क आज पार पडणार आहे. आतापर्यंत एकत्र असलेल्या टीम ए मध्ये आता निक्कीच्या विरुद्ध अन्य तिघे असा प्रकार पाहायला मिळतोय. जान्हवी आणि अरबाज आजच्या भागात निक्कीच्या बदललेल्या स्वभावाबाबत गॉसिप करताना पाहायला मिळतायत तर घनश्याम हा बाजूलाच असूनही यातून काढता पाय घेत असल्याचे दिसतेय. आजच्या भागाची ही झलक आवर्जून पाहा