सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघडीच्या वतीने आज महायुती सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात येणार आहेत. मविआच्या या आंदोलनावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.”हे आंदोलन पूर्णपणे राजकीय आहे. महाविकास आघाडी असो वा काँग्रेस पक्ष, त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर केला नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.