रविवारी (२९ सप्टेंबर) नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. आपल्या भाषणात बोलतान त्यांनी भाजपावर तसेच शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. नागपुरमध्ये हा कार्यक्रम पार पडत असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वावरून थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रश्न केला. मोहनजी आम्ही तुम्हाला हवे आहोत की नको हा भाग सोडा, पण भाजपाचं हे हिंदुत्त्व तुम्हाला मान्य आहे का? असं उद्धव ठाकरे म्हणाले.





















